जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यांत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासह ४२ गुन्हे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाने दाखल केले आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक अं. व दक्षता उषा वर्मा तसेच विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ नाशिक विभाग नाशिक व अधीक्षक सिमा झावरे, यांचे गावठी हातभट्टी दारुचे मुळ उच्चटन करण्याचे आदेशानुसार माहे जानेवारीमध्ये भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यात केलेल्या धडक कारवाईत विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ यांच्या पथकाने अवैध ढाबे, हातभट्टी दारु निर्मिती व विक्री केंद्रे, हातभट्टी दारु वाहतुक तसेच बनावट मद्य निर्मिती, विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर छापे टाकून ४२ गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला
३४,२०० -लिटर रसायन, ६५३-लिटर गावठी हातभट्टी दारु, १६९.०२ लिटर देशी मद्य, ७२.१६ लिटर विदेशी मद्य, ५५.४९ लिटर बियर, १३१.४० लिटर बनावट विदेशी मद्य, ०१ ओमनी कार, ०३ मोटरसायकल,
वरील प्रमाणे एकुण रफ. १२,०२,९७७/- किमतीची मुद्देमाल मिळुन आला असुन आरोपींवर मुंबई दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदर कारवाई विभागीय निरीक्षक सुजित ओ. कपाटे (राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ), राजेश सोनार (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ), सत्यविजय ठेंगडे (दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, यावल) तसेच विभागीय निरीक्षक पथकाचे जवानांनी वाहनचालक सागर देशमुख, सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान विठ्ठल हाटकर, योगेश राठोड यांनी यशस्वी रित्या पार पाडली, गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक सुजि कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, दुय्यम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे हे करीत आहे.
अवैध मद्यविक्री विरोधात कारवाया सुरु राहतील – सुजित कपाटे
तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भुसावळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यात या पुढेही अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्री तसेच अवैध मद्यविक्री ढाब्यांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया सुरु राहतील असे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ सुजित कपाटे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.