जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मनियार बिरादरीची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षतेखाली शिरसोली येथील नशेमन कॉलनी येथे पार पडली. या सभेत एकूण १२ विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
मागील सभेचे इतिवृत्त, १९-२० चे वार्षिक अहवाल व जमा खर्चाला मंजुरी, अंदाज पत्रका पेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, वीस एकवीसच्या अंदाजपत्रकास मंजुरी, वीस एकवीस साठी खैरनार अँड कंपनीची ऑडिटर म्हणून नियुक्ती, एकोणीस वीसच्या लेखापरीक्षकांच्या अहवालाची नोंद, कार्यकारी मंडळ यांच्या सूचना वर विचार करून निर्णयास संमती, बिरादरीच्या नियोजित खुल्या भूखंडावरील बांधकामाला मंजुरी, सभासदांची यादीला मंजुरीसह या वर्षी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
नवदांपत्य व त्यांच्या पालकांचा गुणगौरव समारंभ
८ ते १० फेब्रुवारी या अवधीत बिरादरीमध्ये तीन ठिकाणी मुली बघायला आलेत आणि लग्न करून गेले अशा नव वर वधूंचा व त्यांचा पालकांचा यथोचित गुणगौरव या वार्षिक सभेत करण्यात आला. यात प्रामुख्याने शेख इफ्तेखार अहमद शिरसोली व अरशीन सय्यद चाळीसगाव, जुनेद शेख जळगाव व नाजिया बी नाचणखेडा व साबीर शेख इच्छापूर व आयशा बी जळगाव या तिघी नव दाम्पत्याचा पन्नास घरगुती भांडी देऊन सत्कार करण्यात आला. तर त्यांच्या पालकांचा सुद्धा शाल व दुपट्टा देऊन गौरव करण्यात आला. यात इब्राहीम हाजी, सय्यद हनीफ गुलाम रसूल बक्श व शेख अफजल, अन्सार शेख व फारुक शेख तसेच महिला पालक म्हणून कमरून निशा बी, नसीम बानू, जाहिदा बानो, अखीला बी, नजमा बी, मदिना बानू मध्ये यांचा समावेश होता
बोहरा, मेमन व मुस्लिम बिरादरीने केला गौरव
८,९ व १० फेब्रुवारी रोजी अनोख्या व इतिहासात नोंद होईल याप्रमाणे मुलगी बघायला आले व लग्न करून गेले याची माहिती बोहरा समाजाचे युसूफ मकरा, मेमन बिरादरीचे हनीफ सत्तार मेमन व मुस्लिम बिरादरीचे रहीम रज्जाक मलिक यांना लागली होती. म्हणून त्यांनी त्वरित बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांना संपर्क करून या तिघी नवदाम्पत्याला भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्याची इच्छा प्रदशीत केली व भांडीचे सेट उपलब्ध करून दिले व आपल्या बिरादरीने केलेल्या कार्याचे आमची बिरादरी सुद्धा योग्य तो सन्मान करून हीच पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन सुद्धा दिले.
वार्षिक सभेत यांचा होता समावेश
फारुक शेख सय्यद चांद, हारून शेख, ताहेर शेख, आबिद शेख, अल्ताफ शेख, मुश्ताक शेख, रऊफ टेलर (सर्व जळगाव), अजिज शेख (पाळधी), हकीम चौधरी (मुक्ताईनगर), असलम शेख (साकली), शब्बीर शेख (अडावद), मुनाफ शेख (जामनेर), शफी शेख (कजगाव), साबीर शेख (भुसावळ), इक्बाल शेख (धरणगाव), नबी मिस्तरी, इब्राहिम बिस्मिल्ला, (शिरसोली), रियाज शेख इस्माईल शेख, अबुजर शेख, करीम शेख (नशिराबाद), शब्बीर चुडीवाला (चाळीसगाव), हाजी दगडू शेख (भडगाव), हारून रशीद (बोरनार), अर्षद शेख रफिक (बोदवड) यांनी सभेत चर्चा केली.
यांच्या सहकार्याने यशस्वी झाली सभा
हाजी इब्राहिम, नबी मीस्तरी, खलील शेख, करीम शेख, शाकीर शेख, तौफिक शेख व गुलाम शेख, सर्व शिरसोली तसेच जळगावचे समीर शेख, आबीड शेख, सलीम शेख व साबीर शेख यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.