TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंसह कुटुंबियांना तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, जाणून घ्या…नेमकं काय आहे प्रकरण?

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2023
in गुन्हे, मुक्ताईनगर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी आमदार एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या दंडाची नोटीस मुक्ताईनगर तहसीलदारांनी बजावली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण !
‘मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथे खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीन खरेदी करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्गासाठी बेकायदेशीरपणे एक लाख 18 हजार ब्रास गौणखनिज उत्खनन करण्यात येऊन तब्बल ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आला आणि शासनाची फसवणूक झाली,’ अशी तक्रार मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महसूलमंत्र्यांकडे केली होती. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

४०० कोटींचा घोटाळा, आमदार चंद्रकांत पाटलांनी केला आरोप !
खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर. जमिनीची खरेदी करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्गासाठी लागणाऱ्या गौण खनिजासाठी अवैध उत्खनन करीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानुसार महसूलमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. या चौकशी पथकाने सादर केलेला अहवाल राज्य शासनाने गेल्या महिन्यात स्वीकारला आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे.

६ ऑक्टोबर रोजी बजावल्या नोटिसा !
मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजावल्या आहेत. मुक्ताईनगर तहसीलदार यांनी बजावलेल्या नोटिसीनुसार , मुक्ताईनगर तालुक्यातील सातोडमध्ये एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या गट क्रमांक २२५ मधील १/२, २/१, २/२, २/३ या पोटहिस्स्यातून अवैध उपसा करण्यात आला आहे. त्यानुसार एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह सातोड (मुक्ताईनगर) येथील सहा जमीनमालकांना ६ ऑक्टोबर रोजी एकूण १३७ कोटीहून अधिक दंडाच्या रकमेच्या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. एकनाथराव खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे कळते. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे. यापोटी पाच पटीने दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

काय सांगता : मेलेली माणसं...ग्रामपंचायतच्या दप्तरी जिवंत ; चक्क पैसेही काढले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १२ एप्रिल २०२३ !

April 12, 2023

शेतकऱ्यांनी बंधार्‍यात साठवलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करा !

May 26, 2021

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025

सासुरवाडीला जायला निघालेल्या तरूणासोबत रस्त्यात घडलं भयंकर !

May 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group