TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील ट्रान्सफार्मरसह अन्य कामांसाठी १५ कोटींच्या कामांना मान्यता !

दोन वर्षात ३१ कोटींचा भरीव निधी ; पालकमंत्री ना. पाटील यांचा शेतकरी हिताचा वसा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकर्‍यांच्या हितासाठी शिंगाडे मोर्चे काढण्यासाठी ख्यात असलेले पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आता जिल्ह्याची धुरा हाती असतांना शेतकर्‍यांना कृषी वापरासाठी अडचण येऊ नये म्हणून यंदा तब्बल १५ कोटी रूपयांची विजेची कामे मंजूर केली आहेत. दोन वर्षात विक्रमी ३१ कोटींच्या कामांना मान्यता देऊन ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी हिताचा वसा जोपासल्याचे दाखवून दिले आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात शेतीचे पंप वारंवार जळत होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करण्यासाठी विजेची समस्या उद्भवत राहते, घरगुती ,शेती पंप व पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी वीज पुरवठा पूर्ण दाबाने सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांचेकडून नवीन ट्रांसफार्मर बसविण्याबाबत, खराब झालेले इलेक्ट्रिक पोल बदलुन मिळणेबाबत, अपघात होऊ नये म्हणून केबल ची कामे करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. ना. गुलाबराव पाटील यांनी याची दखल घेऊन शेतकर्‍यांच्या सर्वात महत्वाच्या समस्येचे निराकरण केले आहे.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सन २०१८ – १९ पर्यंत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत म्हणजेच डीपीडीसी अंतर्गत या कामांसाठी केवळ २ कोटी रुपये मंजूर होते मात्र मागील वर्षापासून वीज समस्यांची पूर्णपणे जाण असलेले पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेऊन मागील वर्षी सदर १९४ कामांसाठी १६ कोटी ५५ लक्ष निधी मंजूर करून ऊर्जा विभागाकडे वितरित केला होता. तर यावर्षी तब्बल ३०९ कामांसाठी १४ कोटी १२ लक्ष ६९ हजाराचा निधी मंजूर केला असून निधी वितरित करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

मागील काळात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निधीअभावी अनेक अडचणींना सामोरे जाताना पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच अधीक्षक अभियंता श्री शेख यांनी जिल्ह्यात पूर्ण दाबाने व सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी तब्बल २ ते ३ वेळा तालुकानिहाय बैठका घेऊन लोकप्रतिनिधींकडून समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच मागील महिन्यात झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत खासदार आमदार व सर्व लोकप्रतिनिधींना प्रस्ताव सादर करण्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचना केल्या होत्या त्यानुसार यावर्षी या वर्षी ३०९ कामांबाबत १४ कोटी १२ लक्ष साठ हजार मागल्या वर्षी १४ कोटी ५५ लक्ष असे २ वर्षात सुमारे ३१ कोटी रुपये निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे. तसेच उर्वरित प्रस्ताव देखील मे पर्यंत मंजूर करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले असल्याचेही ना पाटील यांनी सांगितले.

तालुकानिहाय मंजूर कामे

ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अमळनेर – मंजूर कामे १३ : निधी ६४.१०८ लक्ष ; भडगाव – ११ कामे : ५२.७९० लक्ष ; पाचोरा – २१ कामे : ११६.४३१ लक्ष ; भुसावळ -२१ कामे : ८९.४५८ लक्ष ; बोदवड – २५ कामे – १०८.९८९लक्ष ; मुक्ताईनगर – १२ कामे : ५३.८८५ लक्ष ; चाळीसगाव – १० कामे : ४६.५४७ लक्ष ; चोपडा – २० कामे : ९५.४०८ लक्ष ; धरणगाव – ५४ कामे : २०२.३८० लक्ष ; जळगाव – ४७ कामे : २४८.८८८लक्ष ; जामनेर – १८ कामे : ८६.२८१ लक्ष ; एरंडोल – १० कामे : ६०.५८२ लक्ष ; पारोळा – ८ कामे : ३९.३७२ लक्ष ; रावेर- २८ कामे : ९७.०९३ लक्ष ; यावल – ११ कामे : ३९.८६१ लक्ष

शेतकरी हित सर्वतोपरी !

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक असून त्याच्यासाठी वीज हा जीव की प्राण आहे. पुरेशा विजेअभावी शेतकर्‍यांची को्ट्यावधीची हानी होत असते. यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्षात तब्बल ३१ कोटी रूपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून याचा बळीराजाला लाभ होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

माहिती आयोगाने केला सेवानिवृत्त उपकुलसचिव ज्ञानदेव नीलवर्ण यांना अडीच हजाराचा दंड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

January 6, 2021

कृषी विधेयकांवरुन शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन सुरु ; पंजाबमध्ये रेल्वे ठप्प

September 25, 2020

भारत बंदमध्ये सहभागी व्हा : मुकेश येवले

December 7, 2020

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

August 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group