पटना (वृत्तसंस्था) दारूबंदी असलेल्या बिहारच्या (Bihar) वैशालीमध्ये दारूच्या नशेत ड्रायव्हरने 30 हून अधिक लोकांना चिरडले. यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश आहे. हे सर्व लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत होते.
हाजीपूर-महानर मुख्य रस्त्यावरील देसरी पोलीस स्टेशन हद्दीतील नयागाव टोलाजवळ हा अपघात झाला. नजीकच्या ब्रह्मस्थान येथे भुईं बाबाची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित ट्रकने अनेकांना चिरडले आणि नंतर ट्रक एका झाडावर आदळला. सर्व मृतांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास सुलतानपूर गावाजवळ हा अपघात झाला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालक दारूच्या नशेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
मृत सर्व 20 वर्षाखालील आहेत
मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 8 वर्षांची वर्षा ते 20 वर्षांच्या चंदनाचा समावेश. ही सर्व मुले रविवारी सायंकाळी गावातील सर्वात जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ भुईं बाबाची पूजा करण्यापूर्वी नेवतन विधीत सहभागी होण्यासाठी गेली होती. आता त्यांच्या मांसाच्या गुठळ्या त्याच झाडात अडकल्या आहेत. वर्षा कुमारी (8), सुरुची (12), अनुष्का (8), शिवानी (8) , खुशी (10), चन्दन(20), कोमल (10) आणि सतीश (17)