जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जळगाव धरणगाव व पाचोरा तालुक्यातील 544 किमी लांबीच्या 165 योजना बाह्य शेती रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001 – 2021 मध्ये समाविष्ट होण्यासाठी तसेच जळगाव ग्रामीण मधिल 27 गावांच्या 371 किमीच्या 26 ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 544 किमीच्या 165 ग्रामीण शेती रस्त्याना शासनाचा ग्रामीण मार्ग दर्जा मंजूर म्हणून घोषित केले आहे. तसेच 371 किमीच्या ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग म्हणून सा. बा. विभागाने दर्जोन्नतीसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे तब्बल 915 किमीच्या रस्त्यांचा कायापालट होणार असून शेतकरी केंद्रबिंदू म्हणून शेतकऱ्यांसाठी रस्ते हा विकासकामांमध्ये सर्वात अविभाज्य घटक म्हणून मतदारसंघातील प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता हा अतिशय दर्जेदार असावा यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेती रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून तर ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग म्हणून मंजुरी मिळाल्याने जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकास होण्याचा मार्ग सुकर झाल्यामुळे शेतकऱ्यां , प्रवाशाना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
544 किमीच्या 165 शेत रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा (VR) दर्जा प्राप्त
जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव तालुक्यातील 52 गावांच्या 154.50 किमी लांबीच्या 41 शेती रस्त्यांना , जळगाव तालुक्यातील 86 गावांच्या 381.50 किमीच्या 121 रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हापरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास शासनाची मान्यता मिळाल्याने परिणामी रस्ते विकास योजना 2001 – 2021 मधील जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे एकूण लांबी 544 किमीने वाढ होऊन एकूण लांबी 7359.210 किमी इतकी झाली आहे.
371 किमीच्या 26 ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग (ODR) म्हणून दर्जोन्नती
जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव तालुक्यातील 20 गावांच्या 318.50 किमी लांबीच्या 21 शेती ग्रामीण मार्गांना, धरणगाव तालुक्यातील 05 गावांच्या 52.50 किमीच्या 05 रस्त्यांना अश्या एकूण जळगाव ग्रामीणमधिल 25 गावांच्या 371 किमीच्या 26 ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्गाचा दर्जास शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. जळगाव व धरणगाव तालुक्यात इतर जिल्हा मार्गावर काम करण्यासाठी रस्ते शिल्लक नव्हते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व जिल्हा परिषद मार्फत 5054 अंतर्गत काम इतर जिल्हा मार्ग नसल्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेने शासनाच्या सा. बा. विभागाकडे ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग दर्जोन्नात करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. इतर जिल्हा मार्गांच्या एकूण लांबीत371 किमी ने घट होऊन सद्या स्थितीत 10734.640 किमी आहे.
रस्ते बांधणीतूनच शेतकरी हित जोपासले जाते – पालकमंत्री गुलाबराव पाटील
रस्त्यांच्या विकासातून शेतकऱ्यांचे हित साध्य होते. दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध असतील तर तसेच शेती रस्त्यांचा कायापालट झाल्यास शेती उद्योगाला चालना , रोजगार व उद्योग वाढीला चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊनच जिल्ह्यात व मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी ग्रामीण रस्त्यांचे दर्जोन्नात होणे गरजेचे आहे. ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने रस्त्यांचे महत्व व गांभीर्य लक्षात घेऊन सदर 165 रस्त्यांच्या 544 किमीच्या शेत रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून तसेच जळगाव ग्रामीणमधिल 25 गावांच्या 371 किमीच्या 26 ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्गाचा दर्जास शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील महिन्यात जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बजेट मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे.