TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात १६९४ मतदार करणार घरी बसल्या मतदान ; गृह भेटी द्वारे मतदान प्रक्रियेस जिल्ह्यात प्रारंभ !

८ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार प्रक्रिया !

vijay waghmare by vijay waghmare
November 9, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दि.८ नोव्हेंबर -विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रापर्यंत पोहोचू न शकणारे वयाची ८५ वर्ष पेक्षा अधिक वय असलेले मतदार, दिव्यांग मतदार, दीर्घ आजाराने ग्रस्त असलेल्या मतदारांचे गृह भेटीद्वारे मतदान करून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. जळगाव जिल्ह्यात गृह मतदानाला शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात १६९४ मतदार घरी बसल्या मतदान करणार आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोगाने अनुपस्थित मतदारांच्या घरोघरी जाऊन टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेण्यासाठी ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार, दिव्यांग मतदार, कोविड किंवा दीर्घ आजाराने बाधित असलेले रुग्ण यांचे गृहभेटीद्वारे मतदान करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात एकूण १६९४ मतदारांचे घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यात येणार आहे. यासाठी १०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांचे फौज जिल्हाभरत तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान ही प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघात एकूण १६९४ मतदार घरी बसल्या मतदान करणार आहे. त्यात वय वर्ष ८५ पेक्षा अधिक असलेले १३६७ तर ३२७ दिव्यांग मतदार यांचा समावेश आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

जळगाव शहर विधानसभा मतदार संघात १३ व १४ नोव्हेंबर रोजी गृह भेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेदरम्यान ६२ मतदार घरी बसून आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.भुसावळ विधानसभा मतदारसंघात १२ व १३ नोव्हेंबर रोजी गृहभेटीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून एकूण २०१ मतदार घरी बसल्या मतदान करणार आहेत. एरंडोल विधानसभा मतदारसंघात ८ नोव्हेंबर पासून गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला असून एकूण १७३ मतदार घरी बसल्या मतदान करणार आहेत. चोपडा विधानसभा मतदारसंघात 0८ ते 0९ नोव्हेंबर या कालावधीत गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेदरम्यान ७० मतदार घरी बसल्या मतदान करणार आहेत. रावेर विधानसभा मतदारसंघात १० नोव्हेंबर पासून गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार असून या प्रक्रियेदरम्यान एकूण २१८ मतदार घरी बसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ८ नोव्हेंबर पासून गृहभटीद्वारे मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रक्रिया दरम्यान १०४ मतदार घरी बसल्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाचोरा विधानसभा मतदारसंघात १४ व १५ नोव्हेंबर रोजी गृहभेटीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून २४२ मतदार घरी बसल्या मतदान करू शकणार आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात ९ नोव्हेंबर पासून गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान ११३ मतदार घरी बसल्या मतदान करतील. जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघात 8नोव्हेंबर पासून गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

या प्रक्रियेदरम्यान १९० मतदार घरी बसून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जामनेर विधानसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान गृहभेटीद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात १४३ मतदार घरी बसल्या मतदान करू शकणार आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात ८ नोव्हेंबर पासून गृह भेटीद्वारे मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रक्रिये दरम्यान १७८ मतदार घरी बसून आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

अमळनेर चर्मकार समाज मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरात लग्नाची लगबग ; बालिकेचा टाकीत बुडून मृत्यू !

December 11, 2023

मोठी बातमी : शिवसेनेचे १५ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात?

July 14, 2022

वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर छापा; चालक व मालकावर जळगावात पोलीसात गुन्हा दाखल !

August 28, 2024

LIC : दररोज २०० रुपयांची बचत मिळवून देईल २८ लाखांचा फंड ; जाणून घ्या.. काय आहे योजना?

January 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group