चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोढरे येथील एका १७ वर्षीय तरूणाचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी उघडकीस आली.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील बोढरे येथील अनिल शिवाजी राठोड (वय १७) या तरूणाचा शिवारातील एका विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. अनिल राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, काळाने त्यांच्यावर घातलेल्या घालामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.