अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील करणखेडा येथे अंबारे रोडवरील लावलेल्या बँडच्या गाडीतून २ लाख ६६ हजार ७०० रुपये किंमतीचे वाजंत्रीचे साहित्य चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात गणेश शांताराम गुरव (वय ४२, रा. करणखेडा ता. अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ११ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ०९.०० ते दि १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ वाजेचे दरम्यान मौजे करणखेडा येथे अंबारे रोडवरील करणखेडा ग्रामपंचायत जवळ असलेले खळ्यात लावलेली बॅन्डची गाडी क्र एमएच १६ एई ६०५१ यातील २ लाख ६६ हजार ७०० रुपये किंमतीचे वाजंत्रीचे साहित्य असे कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे समंती शिवाय लबाडीच्या ईराद्याने चोरुन नेले आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सफौ बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.