जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातून २३७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १२७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २९, जळगाव ग्रामीण- ०१, भुसावळ-१७, अमळनेर-०५, चोपडा-१४, पाचोरा-००, भडगाव-०४, धरणगाव-००, यावल-०५, एरंडोल-००, जामनेर-४०, रावेर-०३, पारोळा-०३, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-००, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण १२७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५२ हजार ५१५ पर्यंत पोहचली असून ४९ हजार ८१६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ रुग्णांचा रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १२५२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आता १ हजार ४४७ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.