नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्या जगभरात कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारानंतर अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी वाहतूक रोखली आहे. त्यातच आता ब्रिटनहून २४६ प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं आहे. भारतानेही सुरक्षेच्या कारणास्तवर ब्रिटनसोबतची विमानसेवा बंद केली होती. २३ डिसेंबरला बंद करण्यात आलेली ही सेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे.
भारतात कोरोनाच्या बाबतीत एकिकडे दिलासादायक तर दुसरीकडे चिंताजनक परिस्थिती आहे. देशातील अॅक्टिव्ह आणि नव्यानं नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना नव्या कोरोनाचा आकडा वाढतो आहे. देशात नव्या स्ट्रेनच्या कोरोना रुग्णांची ८० पार गेली आहे. नव्या कोरोनाची दहशत असतानाच आता भारतात ब्रिटनहून आणखी प्रवासी दाखल झाले आहेत. यूकेमध्ये (UK) नवा कोरोना आढळल्यानंतर २३ डिसेंबरपासून भारतात ब्रिटनहून येणारी विमान वाहतूक रोखली होती. मात्र त्याआधी भारतात यूकेहून परतलेल्या नागरिकांची तपासणी केली जात होती. त्यामध्ये नव्या स्ट्रेनचे एकूण ८२ रुग्ण आहेत. दिवसेंदिवस हा आकडा वाढतो आहे. त्यात आता भारतानं बुधवारी ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा सुरू केली. यूकेहून २४६ प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं आहे. प्रत्येक आठड्याला भारतातून १५ आणि ब्रिटनहून १५ अशा ३० विमानांचं उड्डाण होणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. दरम्यान दिल्ली सरकारनं नव्या कोरोनाला आळा घालण्यासाठी काही पावलं उचचली आहेत. यूकेहून जे लोक येतील आणि ज्यांनी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना आयोसेलेसनमध्ये ठेवलं जाईल. तर ज्यांची टेस्ट निगेटिव्ह येईल त्यांना ७ दिवस क्वारंटाइन आणि त्यानंतर ७ दिवस होम क्वारंटाइन केलं जाईल.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बंदी अजून वाढवावी अशी मागणी केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “केंद्राने ब्रिटनमधील विमानांवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील गंभीर परिस्थिती पाहता ही बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवावी अशी माझी केंद्राला विनंती आहे. खूप परिश्रम घेतल्यानंतर कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. ब्रिटनमधील परिस्थिती गंभीर आहे. ही बंदी उठवून आपण आपल्या लोकांचा जीव धोक्यात का घालत आहोत?”.
















