जळगाव (प्रतिनिधी) शिरसोली येथील २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुकलाल मराठे असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. इंदिरा नगर येथील रहिवासी सुकलाल भानुदास मराठे यांचा मुलगा सुभाष सुकलाल मराठे (वय २५) हा आज गुरुवारी दि. २४ रोजी ४.१५ वाजेच्या सुमारास घरी एकटा होता. यावेळी पत्राच्या राहत्या घरात छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना सुभाषची आई केवळाबाई मराठेंच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच आजूबाजूच्या लोकांना बोलावून शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यांनी घटनास्थळी येऊन सुभाषला खाली उतरून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता त्याला वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. सुभाष हा मिस्त्री काम करायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, विवाहीत बहीण आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंदणी करण्यात आली आहे.