धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळेसीम शिवारातून २५ हजार रुपयांच्या अँल्युमिनियम तार चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील सहाय्यक अभियंता हर्षल भागवत नेहते (वय २९ रा. मु.पो. आसोदा जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २६ एप्रिल २०२२ रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने २५००० रुपये किंमतीची अंदाजे २१६० मिटरची अँल्युमिनियम तार गट क्र ६३/१ पिपळेसिम शिवारातून चोरुन नेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. पाटील हे करीत आहेत.