चोपडा (प्रतिनिधी) मा. उच्च न्यायालय मुंबई व मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये दि.9 सप्टेंबर 2023 शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते. यात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण 554 पैकी 43 तर दाखलपूर्व प्रकरणे ग्रामपंचायतीच्या दाखल पूर्व प्रकरणे, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बीएसएनएल, म.रा.वी. मंडळाच्या दाखलपूर्व 8161 प्रकरणापैकी 299 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 62 लाख 46 हजार 896 रुपयांची झाली.
सकाळी ११ वाजता राष्ट्रीय लोक अदालतला सुरुवात झाली. यावेळी पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. व्ही. पाटील – राठोडे यांच्या सह पंच म्हणून ॲड. सी. आर. निकम, चोपडा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी. एस. सोनार, ॲड. प्रविण एच. पाटील , अँड. संदीप जे. पाटील, ॲड. सचिन पाटील, ॲड. ॲड. एच. एम. सैय्यद, ॲड. ए. ए.हुसेन, ॲड. एस.आर. शर्मा, ॲड.नितिन महाजन, ॲड. मिलींद बाविस्कर, ॲड.एस.एफ.जैन, ॲड.एस. डी. सोनवणे, ॲड.उमेश बी.पाटील, ॲड.एस. डी. पाटील, ॲड. एस. एन. बडगुजर, ॲड. एच. डी. सोनवणे, ॲड. सुयश ठाकूर, ॲड.अंबादास एस. पाटील , ॲड. दीपक पाटील, ॲड. सी. एच. पाटील, ॲड. आर. एस. बाविस्कर, ॲड. जे. के. बारेला, ॲड. सी. बी. सोनवणे, ॲड. बी.सी. पाटील, ॲड. व्ही. डी. बाविस्कर, ॲड.विशाल एस. पाटील, ॲड. एस.एस. राजपूत, ॲड. नितीन चौधरी, ॲड. जे. आर. पाटील, ॲड. यु . के. पाटील, ॲड.व्ही.एस.नाईक, ॲड. किरण जाधव, ॲड.अशोक जैन, ॲड. नितीन पाटील, सरकारी अभियोक्ता व्ही. डी. मोतीवाले हजर होते.
चोपडा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण 554 ठेवण्यात आले होते त्यातून फौजदारीचे धनादेश अनादर प्रकरणे 26 व पती-पत्नी वादाचे 02 प्रकरण व दिवाणी प्रकरणे 15 अशी एकूण 43 प्रकरणें निकाली काढण्यात आले यात 38 लाख 53 हजार 867 रुपये वसूली झाली. बँक,मराविम व ग्रामपंचायतीचे दाखल पूर्व प्रकरणे यांची एकूण 8161 प्रकरणातून 299 प्रकरणे निकाली झाले यात 23 लाख 93 हजार 29 रुपये वसूल करण्यात आले. अशी एकूण 62 लाख 46 हजार 896 रुपये वसूल करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, सहाय्यक अधीक्षक के. डी. भिंगारे, लघुलेखक आनंदराव माळी,वरीष्ठ लिपिक ए. एच.परदेशी, दिनेश राजपूत, कनिष्ठ लिपिक पी. डी. पाटील, एम. बी. चौधरी, नरेश डी. कुलकर्णी, पी . ए. सोनवणे, एस.जे.देवरे, वाय. ए. महाजन, एस.के. पाटील, शिपाई प्रवीण पाटील, विलास बैसाने, आदिंनी सहकार्य केले. बँकेचे शाखा अधिकारी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांचे सहकार्य लाभले.