नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकार हे नेहेमीच सर्वसामान्यांसाठी काहींना काही नवनवीन सरकारी योजना राबवत असतात आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशाच एका महत्तवपूर्ण योजने बद्दल सांगणार आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojna). या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल.
एका महिन्यात ५५ रुपये जमा करावे लागतील
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा ५५ रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज २ रुपयांपेक्षा कमी पैसे जमा करावे लागतील. म्हणजेच, १८ व्या वर्षी दररोज सुमारे २ रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक ३६००० रुपये पेन्शन मिळू शकते. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या ४० व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. ६० वर्षांनंतर तुम्हाला दरमहा ३००० रुपये म्हणजेच वर्षाला ३६००० रुपये पेन्शन मिळेल.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. नोंदणीसाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.
ही माहिती देणे आवश्यक
नोंदणीसाठी, तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. याशिवाय संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेतही द्यावे लागेल, जेणेकरून वेळेत पेन्शनसाठी त्याच्या बँक खात्यातून पैसे कापता येतील.