जळगाव (प्रतिनिधी) पत्नी मयत झाल्यामुळे कॅनडा येथे मुलाकडे गेलेल्या फकरोद्दीन इब्राहीम बदामी यांचे घर दोन महिन्यांपासून बंद होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरातून ५० हजारांच्या रोख रकमेसह ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २१ रोजी ईश्वर कॉलनीतील सुपारी कारखान्याजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ईश्वर कॉलनीत राहणारे पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झालेले शब्बीर इब्राहीम बदामी (वय ७१) हे एकाच – पार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये चौघे भाऊ वास्तव्यास आहे. त्यांचा भाऊ फकरोद्दीन – बदामी हे त्यांची पत्नी मयत झाल्यामुळे मुलगा कासीम बदामी याच्याकडे कॅनडा येथे दोन महिन्यांपासून राहण्यास गेले आहे. त्यामुळे – त्यांचा फ्लॅट गेल्या दोन महिन्यांपासून बंदच – होता. दि. २१ रोजी शब्बीर बदामी हे नेरी येथे गेलेले असतांना, त्यांची बहिणीने फोन करुन त्यांचा भाऊ फकरोद्दीन बदामी यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घराचा दरवाजा उघडा असल्याची सांगितले. त्यानुसार शब्बीर बदामी हे लागलीच जळगावला येण्यासाठी निघाले.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शब्बीर बदामी यांनी घटनेची माहिती
लागलीच एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यामध्ये चोरटे कैद झाले आहे. ते फुटेज पोलसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.