नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. तसेच देशातील लसीकरण मोहीमेलाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ३७ हजार ५६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ९०७ रुग्णांचा मृत्यू झाला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात सोमवारी देशात ३७ हजार ५६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५६ हजार ९९४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या करोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे. १७ मार्च नंतर म्हणजे १०३ दिवसानंतर करोनाची आकडेवारी ३८,००० हजाराच्या खाली आली आहे. यापूर्वी १७ मार्च रोजी ३५,८३८ कोरोना रुग्ण आढळले होते.
आतापर्यंत देशात ३,०३,१६,८९७ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी २,९३,६६,६०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३,९७,६७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ३,९७,६३७ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यातील स्थिती
काल सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. १० हजार ८१२ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९५.९९ टक्के इतकं आहे. तर काल सोमवारी ६ हजार ७२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे राज्यात आज १०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. सध्या राज्यात १ लाख १७ हजार ८७४ रुग्ण सक्रिय आहेत.
















