लासलगाव (वृत्तसंस्था) लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ टॉवर वॅगेन ट्रेनने (रेल्वेचे दुरुस्ती वाहन) चार कर्मचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात ४ गँगमनचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.44 वाजेच्या सुमारास लासलगाव -उगाव रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली. ठार झाले सर्व कामगार गँगमन होते. टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. पोल नंबर 15 ते 17 मधी ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. हे काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असतांना त्यांना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने अपघातात झाला. त्यात जबर मार लागण्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात संतोष भाऊराव केदारे (वय 38), दिनेश सहादु दराडे (वय 35),कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40), संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38), अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. घटनेमुळे रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. संतप्त झालेले कर्मचारी रेल्वे विरोधात घोषणाबाजी करीत होते.