एरंडोल (प्रतिनिधी) काही एक कारण नसतांना एका ४० वर्षीय महिला व तिची बहीण आणि आईला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नाही तर ४० वर्षीय महिलेला ‘तुझ्याशी शारीरीक संबंध ठेवु दे’ असे म्हणत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २३ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास काहीएक कारण नसतांना ४० वर्षीय महिलेच्या घरा शेजारी राहणारे आरोपी पंकज चौधरी उर्फ गणेश, दत्तु चौधरी आणि दोन महिला अशा सर्वांनी मिळुन महिलेसह तिच्या बहीण व आई अशांना काही एक कारण नसताना खाटा बनविण्याचा लाकडी चाटु व बांधकामासाठी वापरला जाणारा लाकडी फळीने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करुन पंकज उर्फ गणेश याने तुझ्याशी शारीरीक संबंध ठेवु दे असे म्हणुन महिलेचा विनयभंग केला. तसेच महिलेकडून बहीणीला अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर उप. विभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.