नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ४१ हजार ८०६ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३९ हजार १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ५८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४१ हजार ८०६ नव्या कोरोनाबाधितांनी नोंद करण्यात आली आहे. अशातच ३९ हजार १३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. देशात ४ लाख ३२ हजार रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांच्यावर उपचार सुर आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ४ लाख ११ हजार ९८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत एकूण ३ कोटी १ लाख ४४ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी ९ लाख ८७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल ८ हजार ६०२ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६ हजार ०६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ४४ हजार ८०१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७ टक्के झाले आहे. राज्यात १७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
३४ लाख ९७ हजार जणांचे लसीकरण
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १४ जुलैपर्यंत देशभरात ३९ कोटी १३ लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात ३४ लाख ९७ हजार लसींचे डोसे देण्यात आले आहेत. अशातच, आयसीएमआरनं आतापर्यंत ४३ कोटी ८० लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात १९.४३ लाख कोरोना सॅम्पल तपासण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांहून कमी आहे.