मुंबई (वृत्तसंस्था) मला अनेक जण म्हणायचे तुम्ही पक्ष सोडला तर तर इडी तुमच्या मागे लावतील. पण माझा स्वभाव संघर्षचा आहे. त्यामुळे त्यांनी’ ईडी लावली तर मी सीडी लावेल, असा सणसणीत इशारा खडसे यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या दिला आहे.
भाजपात अनेक नेते अस्वस्थ आहेत परंतु त्यांना इडी,सीबीआयची भीती असल्यामुळे पक्षांतर करत नाहीय. परंतु माझा मूळ स्वभाव संघर्षाचा असल्यामुळे मी पक्षांतराचा निर्णय घेतला. कोणी इडी लावली तर मी सीडी लावेल, असं खडसे यांनी म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला. त्यावर खडसे म्हणाले याचा अर्थ तुम्हाला सीडीचा प्रकार माहिती आहे. यानंतर खडसे यांनी सांगितले की, जळगाव शहरातील सागर पार्कवर लवकरच भव्य कार्यक्रम घेऊन आणि त्याचे निमंत्रण आत्ताच मी तुम्हाला देत असल्याचे शरद पवार यांना उद्देशून म्हणाले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. माझा चार वर्ष अतोनात छळ केला गेला. या सर्व गोष्टींना कंटाळून शेवटी मी पक्षांतराचा निर्णय घेतला. ज्या पद्धतीने मी भाजपा वाढविण्यासाठी मेहनत घेतली त्याच पद्धतीने राष्ट्रवादी वाढविण्यासाठी मेहनत घेईल, असे खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी काल रात्री दिल्लीतून एका बड्या नेत्यांचा फोन आला होता आणि त्यांनी पक्षांतर करू नये म्हणून गळ घातली. परंतु मी त्यांना सांगितले की मदत चार वर्ष झाला त्याच्या वेदना काय आहेत हे फक्त मलाच माहीत, असे सांगीतले. ४० वर्षात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही, कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करणार आहे, असेही खडसे म्हणाले.