चोपडा (प्रतिनिधी) शहरातील नारायणवाडी भागात आज तारीख एक रोजी यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, वंदे मातरम ग्रुप, व डॉक्टर राहुल पाटील मित्र मंडळाने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 151 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. या रक्त संचलन कामी आ स करण ताराचंद रक्तपेढी चोपडा, गोडवालकर गुरुजी रक्तपेढी जळगाव, व रेड ब्लड बँक यांनी परिश्रम घेतले.
सकाळी आठ वाजता चोपडे शहराचे पीआय मधुकर साळवे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी दीपक जैन महेश शर्मा, बापू महाजन, डेपो मॅनेजर महेंद्र साळुंखे, पत्रकार श्याम जाधव व डॉक्टर तृप्ती पाटील, डॉक्टर राहुल पाटील व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभर रक्तदात्यांचा ओघ सुरू होता. यात महिलांचाही मोठा सहभाग होता. अनेक मान्यवरांनी आणि विशेषत: रक्तदानात ज्यांनी 78 वेळा रक्तदान केले असे भिलाजी पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे हॉस्पिटलचे शवविच्छेदन करणारे पाटील मामू, यांना यावेळी गौरवण्यात आले. रक्तदान करणाऱ्यांमध्ये दोडे गुजर संस्थांचे विश्वस्त प्रवीण पाटील, नंदकिशोर सांगोरे, कांतीलाल पाटील, सागर पाटील, सौ. कविता पवार या दोघे पती-पत्नीने रक्तदान केले. गोळवलकर रक्तपेढीने 67 बाटल्या, चोपडा रक्त पिढीने सतरा बाटल्या व रेड ब्लड बँक पिढीने 63 बाटल्या असे एकूण 151 बाटल्या रक्त यावेळी संकलन करण्यात आले. डॉक्टर मकरंद वैद्य मधुकर सैंदाणे जयवंत पाटील ,जागृती लोहार, डॉक्टर सय्यद रामचंद्र लोहार यांनी वैद्यकीय सोपस्कार पार पाडले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विजय पाटील, सुनील पाटील, विलास पाटील, पंकज पाटील, भरत पाटील जितू पाटील, दिनेश नाथ बुवा, गौतम शिंदे, सेवानिवृत्त सैन्य दलातील जवान राजेंद्र पाटील, हिम्मतराव पाटील, आदींनी सहकार्य केले. शहरात सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे.