TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वृक्षारोपण गैरव्‍यवहार प्रकरणी जिल्‍हाधिकारी यांनी नेमली चौकशी समिती

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2020
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा नगपरिषद सन २०१९-२० या वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण करण्‍यासाठी कंत्राट देण्‍यात आले होते. सदरच्‍या कंत्राटात केवळ १२ लक्ष च्‍या रोपांची मागणी असताना २१.५० लक्ष एवढा प्रचंड खर्च कसा केला त्‍याबाबत माहिती मागीतली असता हा गैरव्‍यवहार निदर्शनास आला आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली आहे.

वन विभागाकडून ३२०० रोपे मोफत मिळाल्‍यानंतरही ३ पुरवठा आदेश देणे, बीले व रोपे लावल्‍याचा पुराव्‍यातील संख्‍या व परिसरात मेळ नसणे, नागरिकांच्‍या रोपे देण्‍याच्‍या दाखल्‍यांवर तारीख नसणे, रोप मिळाल्‍याबाबत पोहोच नसणे, त्‍याचे रजिस्‍टर नसणे, पुरवठा आदेश टिप्‍पणी बॅक डेटेड बनविलेले असणे त्‍यांच्‍या तारखांमध्‍ये मेळ नसणे, एकही बीलास आवक नंबर नसणे असे असतांना हेतुपूर्वक चुकिची बीले काढणारे पाणीपुरवठा अभियंता, व त्‍यासाठी बेकायदेशिररित्‍या तरतुद वाढवणारे लेखपाल व इतर दोषींवर कठोर कारवाई करण्‍यासाठी नगरसेविका संध्‍या महाजन यांनी मुख्‍याधिकारी चोपडा नगरपरिषद यांच्‍याकडे तक्रार अर्ज दि. २४/०९/२०२० रोजी अर्ज केला आहे. त्‍यास नगरसेवक डॉ. रविंद्र पाटील यांनी अनुमोदन केले आहे.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

त्‍यानुसार दि. २९/०९/२०२० रोजी पत्रकार परिषद घेतल्‍याचे कळताच घाईघाईने नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकारींनी त्‍यांच्‍याच अधिका-यांची चौकशी समिती नेमली होती. तसेच सदर कंत्राटदारास कामाला लावून शहरात आता मागील वर्षाच्‍या वृक्षारोपणाचे आता फोटो काढत फिरणे, नागरिकांच्‍या सह्या मागणे अशाप्रकारे खोटे पुरावे जमा करुन, नव्‍याने बनावट कागदपत्रे तयार करुन पाणीपुरवठा अभियंता यांना वाचविण्‍याचा प्रयत्‍न होताना दिसून येत असल्याचा आरोप नगरसेविका संध्या महाजन यांनी केला आहे. तसेच एवढ्या गंभीर आरोपांची चौकशी सुरु असतांना पाणी पुरवठा अभियंता व लेखापाल हे नियमित कामावार हजर असून आता खोटे कागदपत्रे तयार करीत असल्याचे संध्या महाजन यांचे म्हणणे आहे. नगरपालिकेच्‍या चौकशी समितीवर प्रभाव देखिल ते टाकू शकतात. एरव्‍ही अन्‍य कर्मचा-यांवर अन्‍य कर्मचा-यास कारणे दाखवा नोटीस, निलंबन, वेतनवाढ रोखणे असे अनेक प्रकारची कारवाई मुख्‍याधिकारी यांनी केली आहे. परंतु या प्रकरणी अद्याप कारणे दाखवा नोटीस देखिल पाणीपुरवठा अभियंता यांना देण्‍यात आलेली दिसत नाही. यावरून मुख्याधिकारींचे पक्षपाती धोरण स्पष्ट दिसून येते असे सौ महाजन यांचे म्हणणे आहे . नगरपलिकेच्‍याच अधिका-यांची चौकशी समिती नेमण्‍याचे हे नाटक थांबावे व निपक्षः चौकशी व्‍हावी ही सौ. संध्‍या महजान यांची मागणी होती. असेही नगरपालिकेच्‍या चौकशी समितीकडून काय कारवाई करण्‍यात येत आहे, याबाबत अर्जदार म्‍हणून सौ. संध्‍या महाजन यांना काहीच कळविले जात नाही असे सौ महाजन यांचे म्हणणे आहे. तसेच नव्‍याने तयार केलेली कागदपत्रे व पालिकेच्‍याच अधिका-यांवर दबाव आणून हवा तसा क्लिन चीट देणारा अहवाल मुख्‍याधिकारी देऊ शकत होते.

जिल्‍हाधिकारींनी त्‍यांच्‍या स्‍तरावरुन नेमली चौकशी समिती-
सदर प्रकरणी म. जिल्‍हाधिकारी यांनी दखल घेतली असून दि. १३/१०/२०२० रोजीच्‍या पत्रानुसार दि.१५/१०/२०२० रोजी म. जिल्‍हाधिकारी कार्यालयात म. जिल्‍हाधिकारींची सदर प्रकरणी अर्जदार व मुख्‍याधिकारी यांच्‍या सोबत बैठक झाली. त्‍याअनुषंगाने १९/१०/२०२० च्‍या आदेशानुसार म. जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून त्रयस्‍थ चौकशी समिती नेमण्‍यात आलेली आहे. व त्रयस्‍थ समितीने चौकशी करुन चौकशीचा अहवाल तात्‍काळ सादर करणेबाबत आदेशित करण्‍यात आलेले आहे. या समिती कडून सदर प्रकरणी न्‍याय व्‍हावा व सर्वसामान्‍य गोरगरीब जनतेच्‍या करातून येणा-या पैशालाही न्‍याय मिळावा अशी अपेक्षा संध्‍या महाजन यांनी व्‍यक्‍त केली आहे.

तरीही नगरपालिकेची चौकशी समिती सुरु रहाणार ?
दि. १९/१०/२०२० रोजी जिल्‍हाधिकारी यांनी त्‍यांच्‍या स्‍तरावरुन समिती गठीत केली आहे, त्‍याचे पत्र मिळाले आहे. तसेच नगरपालिकेच्‍या चौकशी समितीला मुदतवाढ दिल्‍याबाबतचे दि. २०/१०/२०२० रोजीचे पत्र सौ. संध्‍या महाजन यांना मिळाले आहे. हा नेमका काय प्रकार आहे हेच कळत नाही. कारण जिल्‍हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमल्‍याचे लेखी आदेश मिळाल्‍यानंतर मुख्‍याधिकारींनी पालिकेच्‍या कर्मचा-यांची चौकशी समिती बरखास्‍त करणे अपेक्षित होते. पण मुख्याधिकारींनी पालिकेच्या चौकशी समितीला मुदतवाढ दिली असून आता पालिकेच्‍या चौकशी समितीचा अहवाल दि.०२/११/२०२० रोजी सादर होणार आहे. याचा अर्थ नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकारींना म. जिल्‍हाधिकारी यांचा आदेश मान्‍य नसावा किंवा समांतर चौकशी करुन प्रती चौकशी, प्रती अहवाल सादर करुन म. जिल्‍हाधिकरींच्‍या समितीचा अहवालास आवाहन देण्‍याचा उद्देश असावा. तसेच हा वरीष्‍ठांच्‍या आदेशाचा अपमान देखिल आहे. यामुळे नेमकी पालिकेची चौकशी समितीच्‍या अहवाल का ग्राह्य धरावा यात संभ्रम निर्माण होत आहे. या सर्व प्रकरणी नगरपालिकेची कुठलीही ढवळाढवळ नको अशी मागणी सौ. महाजन यांनी केलेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
Next Post

शब्द दिला म्हणजे त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन !

June 14, 2022

विरोधकांना एकत्र आणण्याची शरद पवार यांची रणनिती ; उद्या घेणार भाजपविरोधी पक्षांची बैठक

June 21, 2021

अरे बापरे ! पतीचा पत्नीवर चोरीचा आरोप तर पत्नी म्हणाली, माझा पती बायोसेक्शुअल

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group