TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची तीन पट व्यवस्था करावी : कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांसह जिल्ह्यात ऑक्सिजनची तीन पट व्यवस्था करण्यात यावी, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नाशिक महसूल विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधागृष्ण गमे, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, नाशिक जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अहमदनगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, धुळे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी, अपर जिल्हाधिकारी जळगाव प्रवीण महाजन, उपायुक्त (नियोजन) प्रशांत पोतदार, उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडीलकर आणि जिल्ह्याचे नियोजन अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

क्षीरसागर पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुंषगाने बालकांसाठी आयसीयु बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा वार्षिक योजना व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करतांना प्रथम प्राधान्य कोविड विषयक बाबींना देण्याबरोबरच जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच कायमस्वरुपी मालमत्ता तयार होऊन त्याचा फायदा अनेक वर्ष होईल अशा स्वरुपाची विकास कामे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून घेण्यात यावी,अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असेही क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना नाशिक विभागाने सक्षमपणे केला असल्याचे सांगून क्षीरसागर यांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, महसूल आणि पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभाग आणि पत्रकारांनी कोरोना लढ्यात चांगली कामगिरी केल्या बद्दल आभार व्यक्त केले. तसेच ज्या कोरोना रुग्णांना उपचारासाठी वाढीव बील आकारणी झाली असेल त्या बिलांची पुन्हा लेखा परिक्षण करण्यात येवून त्यांना कोरोना विषयक असलेल्या वैद्यकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यान स्मारक उभे करून यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, व्यंगचित्र केंद्र, ओपन जीम, कलादालन, जिल्ह्यातील प्रसिध्द खाद्य पदार्थांचे स्टॉल अशा सर्व समावेशक बाबींचा त्या उद्यान स्मारकात समावेश करण्यात यावा. सदर उद्यान स्मारकाचे विकासकाम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी सन २०१८ ते सन २०२०-२१ या वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच २०२०-२१ व सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत झालेल्या कामांचा आणि खर्चाचा जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय क्षीरसागर यांनी आढावा घेतला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागाचा जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांची व त्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन क्षमतेची माहिती दिली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप ; जाणून घ्या…कोणाला मिळाले कोणते चिन्ह !

November 9, 2021

गुजरातमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळून १२ जणांचा मृत्यू

May 18, 2022

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026

धरणगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.रविंद्र पाटील तर सचिवपदी अॅड. गजानन पाटील यांची निवड !

July 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group