TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकच मुलगी अपत्य असणाऱ्या पालक व मुलींचा सत्कार !

खा.सुप्रिया सुळे यांच्या जन्मदिनी रा.काँ.महिला आघाडी शरदचंद्र पवार यांचा अनोखा उपक्रम !

vijay waghmare by vijay waghmare
June 29, 2024
in मुक्ताईनगर, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ अशी एक म्हण आहे. या म्हणीवरुन स्त्री जन्माच महत्व विशद होते. आपल्या कार्यकर्तृत्वाने दोन घरांना प्रकाश देणाऱ्या एकुलत्या एक मुलींचा त्यांचा पालकांसह सत्कार करण्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या ३० जुन रोजी असणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी तर्फे आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांनी घराबाहेर पडू नये त्यांनी चुल मुल व्यतिरिक्त दुसरे काम करू नये अशी समाजाची भावना असताना शरद पवार यांनी महिलांनी स्वावलंबी व्हावे स्वतःच्या पायावर उभे राहावे त्यांना समान वागणूक मिळावी यासाठी महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.

READ ALSO

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

महिलांना आरक्षण मिळवून दिले, महिलांना न्याय हक्क व स्वतंत्र योजनांचा लाभ मिळण्यासाठी महिला आयोगाची आणि महिला व बालविकास विभागाची स्थापना केली महिलांना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळवून दिला,महिलांना संरक्षण खात्यात आणि पोलिस दलात नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली अनेक महत्वाचे कायदे आणि योजना राबविल्या यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची माता भगिनींना संधी मिळाली. तरी सुद्धा त्या काळात कुटुंबातील मुलाला वंशाचा दिवा मानुन मुलीला कायम दुय्यम वागणुक मिळत असे अशा कठीण काळात “मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून, समान वागणूक देऊन, आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम प्रकारचं काम करुन घेऊ शकतो. व्यक्तिमत्व फुलवो शकतो याची शरद पवार यांना खात्री असल्याने व स्त्रीला संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारचं कर्तृत्व दाखवू शकते असा विश्वास असल्याने शरद पवार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मानंतर दुसरे अपत्य होऊ दिले नाही.

माझा वारस माझी मुलगीच असेल आणि माझी मुलगीच माझे कार्य पुढे नेईल या विचारातून त्यांनी दुसरे अपत्य होऊ न देता समाजा समोर एक आदर्श उभा केला. सुप्रियाताई सुळे यांनीसुद्धा प्रत्येक प्रसंगात शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे राहून आणि आपल्याला मिळालेली जबाबदारी निष्ठेने आणि यशस्वीपणे पार पाडून बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा रथ सक्षमपणे पुढे नेला आणि मुलींना संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारच कर्तृत्व दाखवू शकते हा शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरवला.

आपल्या आजूबाजूला परिसरातसुद्धा असे अनेक पालक आईवडील आहेत ज्यांनी एका मुलीच्या जन्मानंतर तिलाच आपल्या वंशाचा दिवा मानून दुसरे अपत्य होऊ दिले नाही व समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. ३० जुनला सुप्रियाताई सुळे यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी महिला भगिनीतर्फे आपल्या परिसरातील एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा आणि मुलीचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. यातून समाजातील इतर परिवारांनासुद्धा मुलगा मुलगी एक समान असल्याचा संदेश आणि प्रेरणा मिळेल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Congratulations to parents and daughters who have only one daughter!Rohini khadse

Related Posts

गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
Next Post

सेवानिवृत्ती निमित्त मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी !

January 14, 2023

लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट

June 25, 2021

संजय राऊतांना जामीन मिळणार? ९ नोव्हेंबरला न्यायालय देणार निकाल !

November 2, 2022

२०२० या वर्षाने जीवनाच्या बाबतीत खूप काही शिकवलं : अजित पवार

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group