जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ०२, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०१, अमळनेर-००, चोपडा-०२, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ५१ हजार ४९५ पर्यंत पोहचली असून १ लाख ४८ हजार ७८८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५९० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११७ रुग्ण सध्या उपचार घेताय.