धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बालाजी नगरातील संजय बडगुजर (वय ५२) हे स्वतः पडल्यामुळे त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, बडगुजर यांना उल्हास पाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास संजय जानकीराम बडगुजर (वय ५२ रा. बालाजी नगर, धरणगाव) हे स्वत: पडल्यामुळे त्यांच्या डोक्यास दुखापत झाली होती. त्यांना उपचार्थ उल्हास पाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी हे करीत आहेत.