भुसावळ (प्रतिनिधी) आ. संजय सावकारे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्ताने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयामध्ये अल्प दरात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
वरणगाव येथील सुप्रसिद्ध वासुदेव नेत्रालयाद्वारे आमदार संजय सावकारे यांच्या 53 वाढदिवसाचे औचित्य साधत नेत्र तपासणी फी फक्त 53 रुपये ठेवण्यात आली आहे. सदर शिबिर हे दिनांक 11 ते 13 डिसेंबर पर्यंत सुरू होते. आज समारोपाच्या दिवशी आ. संजय सावकारे यांनी संध्याकाळी वासुदेव नेत्रालयात भेट देत आलेल्या रुग्णांशी चर्चा करत त्यांना औषधी वाटली. या शिबिरामध्ये डॉ. रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील नेत्ररुग्णांची तपासणी केली असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
वासुदेव नेत्रालयातर्फे चालवण्यात आलेल्या जनहितार्थ उपक्रमाचे आ. संजय सावकारे यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी तुकाराम पाटील, प्रशांत पाटील, गणेश धनगर, सचिन इंगळे, दीपक फेगडे ,वैभव महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीसाठी कपिल राणे,साजन गवळी,गोलू शेख, योगेश मगरे,मझर शेख आदींनी परिश्रम घेतले.