नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानद्वारे संचालित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कामगिरी केली आहे. स्पेशल सेल, यूपी एटीएस यांच्यासह प्रयागराज इथं छापा टाकला. यावेळी सहा जणांना अटक केली आहे. प्रयागराजमधील करेली या भागात हे सहा जण लपून बसले होते. या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोघा जणांना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देण्यात आली आहे, दोघेही प्रशिक्षित आहे. या सर्वांना कडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व दशतवादी देशातील वेगवेगळ्या भागात घातपात घडवण्याच्या तयारीत होते. या सर्वांना मोठा कट सुद्धा रचला होता. पण, वेळीच स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेमुळे सर्व तपास यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.