जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामद्वारा (जगत) आकाशवाणी चौक लाड वंजारी मंगल कार्यालय जवळ तसेच रामद्वारा (जगत) कांचन नगर येथे सव्वा महिना अखंड रामनामाचे जपाचे आयोजन करण्यात आले होते.
राम नवमीनिमित्त शहरातील ६५० समस्नेही भक्तांनी राम नामाचे स्मरण करून कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला. रामद्वारा (जगत) प्रवर्तक जगतपालजी चांडक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद, राजस्थान, इंदौर, पुणे, जालना, नागपूर, अमरावती व इतर ४५ शहरात कार्यक्रम घेण्यात आला. असे राज सुर्यवंशी यांनी कळविले आहे.