चाळीसगाव (प्रतिनिधी) शेती खरेदीच्या नावावर ७३ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. साईनाथ मल्लू पवार, मोहन मल्लू पवार, ज्ञानेश्वर मल्लू पवार (सर्व. रा. लोहशिंगवे, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे संशयित आरोपींचे नाव आहे.
या संदर्भात गं.भा.सुमन गोपीचंद चव्हाण (वय. ५५ वर्ष, रा. पिंपळगाव ता. चाळीसगाव, ह.मु. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची राजदेहरे ता. चाळीसगांव येथील गट नं. ४८/१/अ क्षेत्र १ हेक्टर ५२ आर व गट व नं.४८/१/ब चे क्षेत्र २ हे. ५२ आर. अशीएकुण ४ हेक्टर ४ आर.(१० एकर ८७ आर.) शेत जमीन ७ लाख ३० हजार रुपये प्रति एकर दराने एकूण ७३ लाख रुपयात विकत घेण्याचे कबूल केले. तसेच त्याप्रमाणे स्टॅम्प पेपर बनवून दिनांक ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय चाळीसगाव येथे सदरच्या जमिनीचे तसेच पिंपळगांव ता.चाळीसगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील घर नं. ४७६चे व खरेदीखतावर सुमनबाई चव्हाण यांच्या सह्या व अंगठे घेऊन ठरल्याप्रमाणे कोणताही मोबदला न देता ७१ लाख ५१हजार रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि सागर ढिकले हे करीत आहेत.