पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील आडगाव फाट्याजवळ ओमनीचे पुढील टायर फुटल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात ८ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
पारोळा तालुक्यातील आडगाव फाट्याजवळ ५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ओमिनी गाडी (एमएच ०५, एक्स २९२६) चे पुढील टायर अचानक फुटले. यामुळे गाडी उलटली. – या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील करमूळ येशील गाटीत बसलेले गेटन सम रहीन पिंजारी सुरेश नाना सोनवणे, विशाल उत्तम जाधव, सुनील जमदार पावरा, साहिल पिंजारी, अनिल जाधव, मयूर वसंत मोरे हे ८ जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, हे सर्व जण कापसाची गाडी भरण्यासाठी जात असताना वाटेत ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सरू होते.
















