TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळ भीषण अपघात : पती-पत्नी जागीच ठार !

vijay waghmare by vijay waghmare
December 2, 2024
in पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोण गावाकडे जाणाऱ्या वळणावर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार झालेल्या भीषण अपघातात कारमधील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुधीर देवीदास पाटील (वय-४८) आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील (वय ४४) दोन्ही रा. लोणी ता. पारोळा ह.मु. गुजरात राज्य असे मयत झालेल्या दाम्पत्याची नावे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे आपल्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्याला होते. दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकांचे ४ डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे मुळ गावी जाण्यासाठी गुजरात राज्यातून आलेले होते. सोमवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे कार क्रमांक (जीजे ०५ आरएच १२४७) ने लोणी गावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून पाटील हे कार वळवत असतांना जळगावकडून धुळेकडे जाणारी भरधाव वेगाने जाणारी ऑडी कार क्रमांक (डीडी ०३ के ६९०३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत गुजरात येथून कारमध्ये आलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गुजरात पासींग असलेली कारचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. तर ऑडी कारमधील जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

READ ALSO

ओमनीचा टायर फुटून उलटल्याने ८ जण जखमी

वाघरे फाट्याजवळ बस अन् टेम्पो अपघातात एक ठार, ४२ जण जखमी !

स्थानिक नागरीकांचे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी फाट्याजवळ ही घटना घडल्यानंतर दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी एरंडोल ते धुळे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाला लागून समांतर रस्ता करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. वारंवार अश्या घटना होत असल्याने अनेकांची जीव जात आहे. आज मात्र प्रत्यक्षात दोन जण जागीच ठार झाले आहे. त्यामुळे आम्हाला समांतर रस्त्यांसाठी रास्तारोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत रस्त्या बनविण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिले जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहिल असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचे दिसून आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeparola

Related Posts

पारोळा

ओमनीचा टायर फुटून उलटल्याने ८ जण जखमी

December 6, 2025
गुन्हे

वाघरे फाट्याजवळ बस अन् टेम्पो अपघातात एक ठार, ४२ जण जखमी !

August 21, 2025
पारोळा

विमा पॉलिसीचे पैसे हडप करण्यासाठी मेव्हण्याने केला शालकाचा खून

April 29, 2025
गुन्हे

पारोळा बस बसस्थानकातून ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास !

January 30, 2025
पारोळा

15 हजारांची लाच भोवली ; पारोळा पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात !

November 27, 2024
पारोळा

महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांना समर्थन देण्याकरिता सिने अभिनेता गोविंदा यांचा रोड शो !

November 16, 2024
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३ डिसेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

BREAKING NEWS : निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला नसेल तिथे निवडणूका पुढे ढकला ; सुप्रीम कोर्टाचे आदेश !

July 12, 2022

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगावच्या श्रीजी जिंनिंगमध्ये कापूस खरेदीला प्रारंभ ; ११, १५३ रुपयाचा भाव !

August 31, 2022

भडगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू ; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश !

May 17, 2023

आयजींच्या विशेष पथकाची जळगावात कारवाई ; दहा लाखांचा गुटखा पकडला, एकाला अटक !

November 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group