नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसह ऑक्सिजन तुटवड्याचं संकटही वाढत चाललं आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होतो आहे. दिल्लीतील एकाच रुग्णालयात ऑक्सिजनअभावी एका डॉक्टरसह ८ रुग्णांचा मृत्यू आहे. रुग्णालयाने दिल्ली हायकोर्टात ही माहिती दिली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात बत्रा हास्पिटलकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की, ”रूग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून, तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. आमच्याकडे दुपारी १२ वाजता ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर आम्हाला दीड वाजता ऑक्सिजन मिळाला. परिणामी आम्ही आमच्या एका डॉक्टरसह रूग्णांचा मृत्यू झाला.”
तर, यावर उच्च न्यायालायने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत आज ४९० मेट्रीक टन ऑक्सिजन पोहचली पाहिजे. जर याचे पालन केले गेले नाही तर न्यायलय अवमाननाची कारवाई करू शकते. जर हे काम पूर्ण झाले नाही तर डीपीआयटीच्या सचिवास पुढील सुनावणीत न्यायालयासमोर हजर व्हावं लागेल. असं कोर्टाने सांगितलं.















