रायगड (वृत्तसंस्था) मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास कशेडी घाटात भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पोलादपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई ते कणकवली प्रवास करणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला कशेडी घाटातील भोगाव गावाजवळ अपघात झाला. या बसमध्ये एकूण ३२ प्रवासी प्रवास करत होते. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. साई राणे असे मृत मुलाचे नाव आहे. तर १५ जखमींना पोलादपूर उपजिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, पोलादपूर पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहे. मदतकार्य सुरु आहे. तात्काळ बचावकार्य सुरु करत २५ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. दुर्दैवाने आठ वर्षाच्या एका लहान मुलाला अपघातात जीव गमवावा लागला आहे. जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण समजलं नसून पोलीस तपास करत आहेत.