जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८७७ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ७२० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १३३, जळगाव ग्रामीण-६२, भुसावळ- १०१, अमळनेर-२२, चोपडा-४०, पाचोरा-४३, भडगाव-१८, धरणगाव-३३, यावल-३१, एरंडोल-२३, जामनेर-१०१, रावेर-४८, पारोळा-२४, चाळीसगाव-९१, मुक्ताईनगर-४०, बोदवड-५५, इतर जिल्ह्यातील-१२ असे एकुण ८७७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२९ हजार ०४९ पर्यंत पोहचली असून ११७ हजार ००९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २३२० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९७२० रुग्ण सध्या उपचार घेताय.
















