एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल शहर व तालुक्यात ९९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.
येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मंगळवारी घेण्यात आलेल्या शिबिरमध्ये व नगरपालिका सभागृहात घेण्यात आलेल्या ९७ रुग्णाची टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील २६ व ग्रामीण भागातील १३ तसेच शहरात दोन रिक्षामध्ये मोबाईल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ही मोबाईल रिक्षा शहरातील विविध ठिकाणी उभी राहून नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. यामध्ये पहिल्या मोबाईल दीक्षामध्ये ६२ नागरिकांच्या टेस्ट घेण्यात आलेल्या यामध्ये १३ व दुसऱ्या मोबाईल रिक्षामध्ये ५७ टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. असे शहरातूनच २१६ टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामीण भागातील रिंगणगाव येथे घेण्यात आलेल्या ८४ टेस्टमध्ये १२, कासोदा येथे घेण्यात आलेल्या २२२ टेस्टमध्ये १६ व आरटीपीआर मध्ये १ व तळई येथे घेण्यात आलेल्या एकूण ३९ टेस्टमध्ये २ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे ग्रामीण भागात ४३ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एरंडोल शहर व तालुक्यात ९९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.