TheClearNews.Com
Monday, March 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

vijay waghmare by vijay waghmare
March 9, 2026
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे सुरू असलेल्या एका बड्या कंपनीतील अवैध सुगंधी तंबाखू आणि गुटखा निर्मितीचा पर्दाफाश करत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. तब्बल ९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त होऊनही या प्रकरणातील मूळ सूत्रधार आणि त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कठोर कारवाई का झाली नाही, असा रोखठोक सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे या गंभीर विषयाला वाचा फोडताना एकनाथराव खडसे यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, ८ जानेवारी २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तळेगाव (दिंडोरी) येथील ‘मे. इलाईटक्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड’ या कंपनीवर छापा टाकला होता. या कारवाईत ९ कोटी ६ लाख २५ हजार ४२५ रुपयांचा प्रचंड मोठा प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्पादन हे स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय सुरू राहूच शकत नाही, असा संशय व्यक्त करत खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणाची ‘SIT’ (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी लावून धरली. खडसे यांनी आपल्या प्रश्नातून मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या या माफियांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. “राज्यात बंदी असलेला सुगंधी तंबाखू, पानमसाला, गुटखा आणि सिगारेट्सचे उत्पादन बिनधास्तपणे सुरू असताना अन्न व औषध प्रशासन विभागातील संबंधित अधिकारी काय करत होते?” असा बोचरा प्रश्न त्यांनी विचारला. या प्रकरणी केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर ज्या अधिकाऱ्यांनी या अवैध कृत्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

READ ALSO

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या घटनेची सत्यता मान्य केली. ते म्हणाले याप्रकरणी मे. इलाईटक्रॉन इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक बिपिन शर्मा, अंजली बम्बोरिया, ॲडव्हर्ट मिचेल बॉरगोईन, सुसंता कुमार पांडा, व्यंकट रमेश पेनुमाका, दयानंद रे आणि आस्थापना यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमान्वये आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा (F.I.R. No. ०९/२०२६) दाखल केल्याचे सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) सोपवण्यात आला असल्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

एकनाथराव खडसे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील गुटखा माफियांमध्ये खळबळ माजली आहे. खडसे यांनी या विषयाचा ज्या पद्धतीने पाठपुरावा केला, त्यावरून त्यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याचा आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे लावून धरल्याचे दिसून येत आहे. आता या प्रकरणाच्या तपासात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonKhadse attacks government in Legislative Council: Administration taken to task over illegal gutkha case worth Rs 9 crore in Nashik

Related Posts

जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
जळगाव

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

March 8, 2026
गुन्हे

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

March 8, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
जळगाव

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सकडे; कृषी क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प – अनिल जैन

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवस्वराज्य दिन साजरा न झाल्याबाबत सरपंच व उपसरपंचांना पदावरून हटविण्यात यावे ; धरणगाव प.स. गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी !

June 10, 2022

धरणगावात एक हजार कुटुंबांना श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे फराळ वाटप

October 26, 2022

धक्कादायक : आवडीचे जेवण न दिल्याच्या रागातून बापाचा खून ; मुलाला अटक

December 1, 2021

धरणगावात पान टपरी फोडली ; ५० हजारहून अधिकचा ऐवज लंपास !

November 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group