नवी दिल्ली (प्रतिनिधी) कारची चावी न दिल्यामुळे १५ वर्षांच्या मुलाने पोलीस पित्याचा चाकूने वार करून निर्घृण खून केला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात ही भयंकर घटना घडली. प्रवीण कुमार असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे.
प्रवीण कुमार यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलाने त्यांच्याकडे कारची चावी मागितली. त्यांनी कारची चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने चाकूने प्रवीण कुमार यांचा खून केला, असे कुरायाचा निकलने प्रवीण कुमार यांची पत्नी आणि सासरे विश्वंभर दयाल घरीच होते. त्यांच्यासमोरच ही घटना घडली. घटनेची माहिती देताना दयाल यांनी सांगितले की, प्रवीण यांचा मुलगा फिरून येण्यासाठी त्यांच्याकडे कारची चावी मागत होता. मात्र, ते नाही म्हणत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी तो कार घेऊन गेल्यानंतर रात्रभर परतला नव्हता. त्यामुळे ते त्याला चावी देत नव्हते. त्यावरून दोघांत वाद झाला. संतापलेल्या मुलाने स्वयंपाकघरातून चाकू आणून व्याकून आणून केला. घाव वर्मी लागून प्रवीण कोसळले. त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. ‘पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रवीण कुमार पॉवर कॉर्पोरेशनमध्ये तैनात होते,’ असे बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक (शहर) शंकर प्रसाद यांनी सांगितले.