TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळीत वॉर्डात पालकमंत्री यांची भेट ; इतर जिल्ह्यातील रुग्णही आहेत भरती !

vijay waghmare by vijay waghmare
September 27, 2024
in जळगाव, वैद्यकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आपण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण हे आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागच्या चार वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन मधून अत्याधुनिक करणासाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले यंत्र सामुग्री दिले आहेत. आज त्यात अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डची भर पडली. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसीतून दिलेल्या मोठ्या निधीमुळे सिव्हील हॉस्पिटल व महाविद्यालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असल्याने सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे हॉस्पिटल वाटत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथे मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ होत्या.

सुसज्ज असे जळीत कक्ष व अतिदक्षता विभाग !

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आणि खा. स्मिता वाघ यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा 20 खाटांच्या जळीत कक्षात ( बर्न वार्ड) 5 खाटांचे आयसीयू, 5 विशेष जळीत खाटा आणि उर्वरित 10 जनरल जळीत खाटांचा समावेश असून येथील सर्व खाटा जळालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत. या अत्याधुनिक वार्डामध्ये वातानुकूलित (ए.सी.) सोयीसह रुग्णांना अधिक आरामदायी उपचार मिळत असून याशिवाय स्क्रीन ग्राफ्टिंगसारख्या जटिल शस्त्रक्रिया आणि हायड्रोशन सारख्या आधुनिक उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच सदर कक्षामध्ये एक सुसज्ज असे लहान शस्त्रक्रिया गृह देखील उपलब्ध आहे ज्यामुळे जळालेल्या रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता अधिक वाढेल. जंतुसंसर्ग कमी होणे, मृत्यूचे प्रमाण कमी होणे व रुग्ण बरा झाल्या व नंतरचे व्यंग/ विद्रूपपणा हे सर्व कमी होण्यास मदत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून एकूण 03 कोटी 60 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

यांची होती उपस्थिती !

याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्य राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सिव्हील सर्जन डॉ किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अक्षय सरोदे डॉ., डॉ. सुरेखा चव्हाण डॉ. राजेश जांभुळकर वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड, योगिता बावस्कर , विश्वनाथ पुजारी दीपक शेजवळ, राजेश जांभूळकर, डॉ. चंद्रमोहन हरणे तसेच अधिसेविका प्रणीता गायकवाड, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्या विभागातील डॉक्टर्स मेट्रन मॅडम व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी DPDC मार्फत देण्यात आलेल्या मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागासाठी यंत्रसामुग्री बाबत सविस्तर माहिती विषद करून यामुळे रुग्णांना होणारे फायदे याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBeing recognized as the most modern equipped hospital in North Maharashtra: Guardian Minister Gulabrao Patil!

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

अमळनेर : चारचाकी वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार; चालक फरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. जयप्रकाश रामानंद यांना अधिष्ठातापदी कायम ठेवा ; प्रवीण कोल्हे यांची मागणी !

August 27, 2021

जळगाव : लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला धडक, ग्रामस्थांनी पेटवली अवैध वाळू वाहतूक करणारी दोन ट्रॅक्टर !

May 9, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २ ऑगस्ट २०२२ !

August 2, 2022

चाळीसगाव : सर्पमित्र मयूर कदमने पकडला विषारी घोणस साप !

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group