मुंबई (वृत्तसंस्था) अनेकांना जुन्या चलनाचा संग्रह, नाणे-नोटांचा संग्रह करण्याची आवड असते. त्यामुळे ते अनेकदा अशा शोधात असतात. जर तुमच्याकडेही जुनी नाणी असतील तर तुम्ही लखपती होऊ शकता. सध्या पाच रुपयाचा जुना कॉईन संग्रही ठेवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. हा पाच रुपयांचा कॉईन तुम्हाला रातोरात लखपती बनवू शकतो.
हे ५ रुपयांचे नाणे काही किरकोळ नाणे नाही. हे अत्यंत दुर्मिळ नाणे आहे. अन्न आणि कृषी विभागाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त हे नाणे जारी करण्यात आले होते. हे नाणे तुम्हाला ८ लाख पर्यंत पैसे मिळवून देऊ शकते. तुम्ही ते ऑनलाइन लिलावासाठी विकू आणि खरेदी करू शकता.
हे ५ रुपयांचे नाणे कसे विकायचे?
तुम्ही क्वीकर (Quikr) सारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तिथे विक्रेता म्हणून नोंदणी करा.
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
त्यानंतर तुमच्या नाण्याच्या दोन्ही बाजूंचे फोटो नीट क्लिक करा.
एखाद्या खरेदीदाराला हे नाणे दिसताच तो स्वतः तुमच्याशी संपर्क साधेल.
हे लक्षात ठेवा
सगळ्या नाण्यांवर साररखीच किंमत मिळत नाही.
सगळेच कॉईन विकल्या जात नाही.
कॉईनची किंमत ही तो किती जुना किंवा दुर्मिळ आहे यावरुन ठरते.
अशा व्यवहारात काळजी जास्त घ्यावी. नाण्याची सत्यता तपासावी.
आर्थिक व्यवहार तसेच दस्ताऐवजांची सत्यता पडताळावी अन्यथा फसवणूक होऊ शकते.