जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आव्हाणा रस्त्यावरच्या खेडी फाट्यावर झाडाला दुचाकी आदळून दुचाकीस्वार प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली. भानुदास गोपाळ जाधव (वय ४५, रा. संत आले. मीराबाई नगर, पिंप्राळा परिसर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
भानुदास जाधव हे संत मीराबाई नगरात कुटुंबासह राहत होते. गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी ते रात्री कानळदाकडे जाण्यासाठी घरातून दुचाकीने निघाले. रात्री ९ वाजेच्या सुमारास आव्हाणा रस्त्यावरच्या खेडी फाट्यावर त्यांचा दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडाला जावून आदळली. यात जाधव यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यु झाला. ही घटना कुटुंबीयांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच आक्रोश केला. यानंतर जाधव यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी जाधव यांना तपासणी अंती मृत घोषित केले.