जळगाव (प्रतिनिधी) : भावाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या किसन रयाजी वसु (वय ७५, रा. गेंदालाल मिल) यांच्या घराचा कडीकोयंडा कोडून चोरट्यांनी घरात डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने आणि राकड असा एकूण ७७ हजार ४४५ रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २४ डिसेंबर ते दि. ७ जानेवारी दरम्यान घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गेंदालाल मिल परिसरात किसन रयाजी वसु हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी कुटुंबियासह वास्तव्यास आहे. दि. २४ डिसेंबर रोजी रात्री त्यांचे भावाचे निधन झाल्यामुळे ते रात्रीच अकोला येथे जाण्यासाठी निघाले. गावाला जाण्यापुर्वी त्यांनी १० ग्रॅमची र्सोन्याची अंगठी, नातीचे १ भार वजनाचे चांदीची चैन व १५ हजार रुपयांची रोकड पेटीत ठेवून त्याला कुलूप लावून गावी गेले होते. भावाच्या तेरवीचा कार्यक्रम आटोपून वसु कुटुंबिय दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घरी परतले.
शहर पोलिसात गुन्हा दाखल
वसु यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लागलीच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.
















