चोपडा (प्रतिनिधी) चोपडा ते धरणगाव रोडवर सुतगिरणीच्या अलीकडे कारने मागून धडक दिल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चोपडा पोलिसात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चोपडा ते धरणगाव रोडवर सुतगिरणीच्या अलिकडे विशाल लीलाधर पाटील (रा. पिंप्री केसम ता. भुसावळ) आणि जितेंद्र प्रताप पाटील (रा.एकलग्न ता.धरणगाव ह.मु. जळगाव) हे दोघं जण आपल्या टीव्हीएस कंपनीची मोटर सायकल क्रंमाक (एमएच १९ डीएक्स ४६५१) ने जात होते. त्याचवेळी चारचाकी वाहन क्रंमाक (एमएच १९ डीव्ही ५२३१) यावरील चालक नाव-गाव माहित नाही. हा त्याच्या ताब्यातील वाहन चोपड्याकडून धरणगावकडे भरधाव वेगात चालवित नेत मोटर सायकलला मागून जोरात धडक दिली. या अपघातात जितेंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कार चालक अपघाताची खबर न देता घटनास्थळावरुन पळून गेला. याप्रकरणी विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोहेकॉ प्रदीप राजपूत हे करीत आहेत.