धरणगाव (प्रतिनिधी) महसूल प्रशासन, जिल्हा पोलीस दल व आरटीओ विभागाकडून शनिवारी बांभोरी गावात वाळू माफियांविरोधात मोहीम राबविण्यात आली होती. याध्ये बांभोरी गावाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत ३० ब्रास अवैधरित्या वाळूचा साठा महूसल पथकाला आढळून आला होता. महसूल पथकाने वाळूचा साठा जप्त केला असून याप्रकरणी एका भिमराव जंगलू नन्नवरे (रा. बांभोरी) याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा सुरु आहे. त्यामुळे वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल. पोलीस प्रशासनासह उपप्रादेशीक परिवहन विभागाकडून संयुक्तरित्या कारवाईची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. पहाटे ५ वाजता धडक मोहिम राबवित अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर वाळू साठा करणाऱ्यांवर देखील कारवाई केली.
गिरणा नदीच्या काठावर असलेल्या बांभोरी गावातील मोकळ्या जागेत दोन ठिकाणी ९६ हजार रूपये किंमतीचे एकुण ३० ब्रास वाळूचा साठा महसूल प्रशासनाला आढळून आला होता. गिरणा नदीतून वाळूची चोरटी वाहतूक करून वाळूचा साठा जमा केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बांभोरी येथील तलाठी गजानन देविदास बिंदवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिमराव जंगलू नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल पथकाने वाळूचा साठा जप्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.