मुंबई (वृत्तसंस्था) प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही चु**गिरी बंद करा, असे वक्तव्य केल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आता वादात सापडले असून त्यांच्याविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही चु**गिरी बंद करा”, असं राऊत म्हणाले होते.
शरद पवार यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपाच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय?, असा सवाल उपस्थित केला होता. पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. चु**गिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.