धरणगाव (प्रतिनिधी) दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती या माथेफिरूने ईस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्ललाहु अलैय सल्लम यांच्याबाबत अपशब्द वापरून समस्त मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी धरणगाव तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, दि. २ एप्रिल २०२१ रोजी एका पत्रकार परिषदेत दिपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती ने ईस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्ललाहु अलैय सल्लम यांच्या विरुध्द हेतुपुरस्कर अपशब्द वापरुन व मुस्लिम धर्मियांविरुध्द भडकावु भाषण केले आहे. यामुळे येथील समस्त मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जाणीवपुर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतुने असे वक्तव्य केले आहे. नरसिंहानंद सरस्वती विरुध्द भा.द.वि. चे कलम १५३/अ व २९५ अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे साहेब व पोलीस स.पोलीस उपनिरिक्षक गणेश अहिरे यांना देण्यात आले.
यासंदर्भात वरील अपशब्द वापरणाऱ्या माथेफिरूला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, या आशयाचे निवेदन धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे व पोलीस ठाण्याचे स.पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस नाईक मिलिंद सोनार यांना समस्त मुस्लीम समाज व पंच मंडळाच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनावर धरणगाव येथील समस्त मुस्लिम समाजातील पंच, व समाजबांधव यांच्या सह्या आहेत.
यावेळी मुस्लिम समाजाचे पंच श्री.नगर मोमीन यांनी सांगितले की, आधीच आपला भारत देश कोरोनासारख्या महाविषारी साथीने त्रस्त झाला आहे, शासन, प्रशासन व जनता ह्या व्हायरसचा अंत आणि याला मोडीत कसा काढता येईल, याबाबत सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत आहेत.
देशावर आलेल्या आपत्ती काळात काही लोकं स्वतःची ओळख, प्रसिद्धी मिळविण्यासाठी दिपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती सारखे विकृत मानसिकता असलेले लोकं समाजात दुफडी व धार्मिक तेढ निर्माण करीत आहेत. अश्या मानसिकता असलेल्या व्यक्तींवर शासनाने कठोर कारवाई करायला पाहिजे. मागील काही दिवसांपूर्वी अलाहाबाद हायकोर्टाने एका खटला दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे की, एखाद्या धर्मनिरपेक्ष राज्यामधील अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये कुणालाही व कोणत्याही धर्मियांच्या धार्मिक भावना दुखविण्याचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीच्या अधिकारात असू शकत नाही. असेही श्री. नगर मोमीन म्हणाले.
याप्रसंगी धरणगाव शहराचे मौलाना सैय्यद ईमाम, ईमाम जुनैद उसमानी, ईमाम गयासोद्दीन, ईमाम सद्दाम हुसैन, नगर मोमिन, तौसिफ पटेल, इस्माईल मोमिन, रज्जाक मोमिन, अमीर साबरी, अब्दूल रहमान उपस्थित होते.