रायगड (वृत्तसंस्था) कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानका जवळ कडावकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या डंपरने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश जाधव (वय ३५) आणि योगिता योगेश जाधव (वय ३१, दोघं रा. जिते ता. कर्जत), असे मृत झालेल्या दोघांचे नाव आहे. या अपघातामुळे जाधव दाम्पत्याची दोन लहान मुलं पोरकी झाली आहेत.
जाधव दाम्पत्य कर्जत तालुक्यातील कुंडळज येथील पाहुण्यांकडे दु:खद घटना घडल्यानं सांत्वनपरभेट देण्यासाठी गेले होते. ते सकाळी 11 वाजण्याच्या आपल्या होंडा कंपनीच्या दुचाकी (क्र. एम एच, ४६. ए एम ९२०१) वरून घरी जिते गाव येथून जात परत येत होते. त्याचवेळी चिंचवळी गाव हदीतील भिवपुरी रेल्वे स्थानका जवळील असलेल्या क्रॉसिंग गेट जवळ पाठीमागून येणाऱ्या दगडांनी भरलेल्या डंपर (क्र. एम एच, ४६. एफ ३७७२) नं थेट दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीवरी दांपत्य हे खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून जात दोघांना डंपरने चिरडले. योगेश जाधव यांना रुग्णवाहिकेमध्ये दाखल करत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर, पत्नी योगिता जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता. मृत दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत. या अपघातामुळे जाधव दाम्पत्याची दोन लहान मुलं पोरकी झाली आहेत. या डंपर चालकाविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.