भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील तापी नदीकाठावरील महादेव मंदिराजवळ तीन दिवसीय पुरूष जातीचे मृत अर्भक गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आढळून आल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली.
मृत अर्भक तापी नदीच्या पाण्यात वाहून आले असावे अथवा अज्ञात मातेने आणून टाकले असावे? असा अंदाज व्यक्त होत आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, तापी नदीकाठावरील महादेव मंदिराजवळील मोकळ्या जागेत पुरूष जातीचे तीन दिवसीय मृत व कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. मृत अर्भक तापीच्या पाण्यात वाहून आले असावे अथवा अज्ञात मातेने ते आणून टाकले असावे, असा अंदाज आहे. याप्रकरणी सोनी सपकाळे (29, भिलवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार फिरोज रज्जाक तडवी करीत आहेत.















