जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीतील ब्रीज हाईट्स अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. तिसऱ्या मजल्यावर राहणारे दिनेश बाबुराव गोडंबे यांच्या घरातून २ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे १६३ ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने तर चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या दीपक प्रकाश परदेशी यांच्या घरातून ३ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज यामध्ये २१२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४७५ ग्रॅम चांदीचे दागने व ४० हजारांची रोकड असा एकूण दोन्ही घरातून सुमारे ६ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. १९ रोजी परदेशी हे गावाहून घरी परतलयानंतर उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील अनुराग स्टेटबँक कॉलनीतील ब्रीज हाईट्स अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर दीपक प्रकाश परदेशी हे राहत असून तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या ओळखीचे दिनेश बाबुराव गोडंबे हे राहतात. दि. ७ रोजी परदेशी हे पत्नी व बहिणीसोबत सुरत येथे नातेवाईकांना भेटण्याकरीता गेले होते. त्यामुळे त्यांनी घरातील बेडरुमचे सेंट्रल लॉक आणि घराच्या मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक व कडीकोयंडा लावलेले होते. दि. १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास परदेशी हे घरी परतले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले सेंट्रल लॉक आणि कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्यामुळे ते लागलीच आजूबाजूच्या लोकांना याबाबत सांगून तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या गोडंबे यांना बोलविण्यासाठी खालच्या मजल्यावर गेले. परंतु दिनेश गोडंबे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक तुटून खाली पडलेले दिसले.
काही वेळातच गोडंबे घरी पोहचले
परदेशी यांनी गोडंबे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांना दिली. काही वेळातच दिनेश गोडंबे हे देखील घरी पोहचले. त्यानंतर पोलिसांसोबत त्यांनी घरात पाहणी केली असता, दोघ घरांमधील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकलेला होता.
२१२ ग्रॅमच्या दागिन्यांसह ४७५ ग्रॅम चांदीचे दागिने लंपास
चोरट्यांनी परदेशी यांच्या घरातील बेडरुमचे सेंट्रललॉक तोडून लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले २१.५ ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, ५५ ग्रॅमची मंगलपोत, ३० ग्रॅमचा नेकलेस, २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, २८.५ ग्रॅमच्या दोन चैन, ८ ग्रॅमचे कानातले, ८ ग्रॅमचे टोंगल, ३ ग्रॅमचे कानातले, १ ग्रॅमचे पेंडल, १६ ग्रॅमची गहुळ पोत, १० ग्रॅमची सोन्याची चीप, १३ ग्रॅमची लहान माळ, अर्धा ग्रॅमची बाळ्या, ९० ग्रॅमचे चांदीचे चैन, ७० ग्रॅमचे ब्रासलेट, १५ ग्रॅमच्या अंगठ्या, १५० ग्रॅमच्या साखळ्या, ५० ग्रॅमचे जोडवे, १०० ग्रॅमचे साकळ्या यासह ४० हजारांची रोकड असा एकूण ३ लाख ९३ हजार ५० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.
डॉग स्कॉटसह फॉरेन्सीचे पथक दाखल
घटनास्थळी रामानंद नगर पोलिसांसह श्वान पथक व फॉरेन्सीकचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाहून फिंगरप्रिंटसह पुरावे गोळा केले. तसेच अपार्टमेंटसह परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून ते ताब्यात घेत चोरट्यांचा शोधघेतला जात आहे.
२ लाख ४४ हजारांचे दागिने लांबवले
परदेशी यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या दिनेश गोडंबे यांच्या घरात चोरी केली. गोडंबे यांच्या घराच्या बेडरुममधील कपाटातील ड्रॉवरमधून चोरट्यांनी ७५ ग्रॅमची मंगलपोत, ५० ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, २० ग्रॅमच्या लहान माळ व १८ ग्रॅमचे सोन्याचे कानातले असा एकूण २ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोलविण्यासाठी गेले अन् चोरी झाल्याचे समजले
गोडंबे यांच्या घराचे सेंट्रल लॉक तुटलेले दिसल्याने परदेशी यांनी त्यांना फोन केला. त्यावेळी गोडंबे यांनी आपण दि. १० रोजी पासून पत्नी व बहीणीसह फत्तेपूर येथे आलो असल्याचे सांगितले. त्यावर परदेशी यांनी माझ्याघरात चोरी झाल्याने मी तुम्हाला बोलविण्यासाठी आलो असता, मला तुमच्या दरवाजाचे कुलूप तुटून खाली पडल्याचे दिसत असल्याने तुमच्या घरात देखील चोरी झाली असून तुम्ही तात्काळ घरी या असे सांगितले. गेले. परंतु दिनेश गोडंबे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे सेंट्रल लॉक तुटून खाली पडलेले दिसले.
















